Monday , September 21 2026
Breaking News

अथणी येथील एका फार्म हाऊसमध्ये आढळला दाम्पत्याचा मृतदेह

Spread the love

 

बेळगाव : अथणी येथील एका फार्म हाऊसमध्ये दाम्पत्याचा मृतदेह आढळल्याची घटना उघडकीस आली आहे.

नानासाहेब बाबू चौहान (58) आणि जयश्री नानासाहेब चौहान (50) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. अथणी हद्दीतील मदभावी रोडजवळील चौहान मळ्यातील फार्म हाऊसमध्ये कुजलेल्या अवस्थेत या दाम्पत्याचे मृतदेह आढळून आले. घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजारील नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन दरवाजा उघडला असता त्यांना कुजलेल्या अवस्थेत दाम्पत्याचा मृतदेह आढळून आला.

पती-पत्नी दोघांचाही पाच-सहा दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा संशय आहे. तो खून आहे का? आत्महत्या? ते पाहणे बाकी आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *