Friday , November 8 2024
Breaking News

येळ्ळूर ग्रामपंचायतीत ५४.२९ लाख रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार

Spread the love

चालू वर्षात २९ कामे न करताच ग्रामपंचायत अध्यक्षांनी लाटले पैसे

बेळगाव : येळ्ळूर गावात चालू वर्षात २९ कामे न करता ५४ लाख २९ हजार रु. येथील ग्रामपंचायतीच्या महिला अध्यक्षांनी बेकायदेशीरपणे पैसे लाटण्याचा आदेश पारित करून सरकारी पैसा लाटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप वकील सुरेंद्र उगरे यांनी केला.

बेळगाव येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अध्यक्षांनी आपल्या पतीचे नाव कंत्राटदार म्हणून टाकणाऱ्या येळ्ळूर गावच्या अध्यक्षा लक्ष्मी मासेकर यांनी ग्रामसभेत ठराव पास करून, कोरोनाच्या संकटकाळात २९ कामे झाल्याचे सांगून सरकारी पैशांची लूट केल्याचा आरोप गावातील काही सदस्यांनी केला आहे.

पीडीओ पूनम गडगे, सचिव सदानंद मराठे, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी श्रीधर बुचडी, तालुका पंचायत अधिकारी श्रीकांत नजरे, नागेश हुगार, दुरुंडेश्वर बन्नुर यांनी येळ्ळूर ग्रा.पं.च्या अध्यक्षाला बनावट कागदपत्र तयार करण्यास मदत केली आहे. ही बाब जिल्हा पंचायतीच्या सीईओच्या निदर्शनासही आणून दिली आहे. आता ग्रामस्थ लोकायुक्तांकडे तक्रार करण्याची तयारी करत आहेत. असे ते म्हणाले.

यावेळी ग्रा.पं.चे उपाध्यक्ष प्रमोद पाटील, सदस्य सतीश पाटील, शिवाजी नंदुकर, रमेश मेणसे, परशुराम परीट, ज्योतिबा जौगुले, मनीषा घाडी, शालन पाटील, सोनाली आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

रुद्रण्णा यडवनावर आत्महत्या प्रकरण : बेळगावात भाजपाची जोरदार निदर्शने

Spread the love  बेळगाव : बेळगाव तहसीलदार कार्यालयाच्या दालनात आत्महत्या केलेल्या एसडीए कर्मचारी रुद्रण्णा यडवनावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *