बेळगाव : साधना क्रीडा केंद्र बेळगाव यांच्या वतीने क्रीडा केंद्राचे सदस्य आणि खो-खो खेळाडू तसेच बूडा चेअरमन श्रीमान संजय बेळगावकर यांचा सत्कार साधना क्रीडा केंद्राचे उपाध्यक्ष श्री. प्रकाश देसाई व प्रकाश नंदिहळी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सतीश बाचीकर, अजित भोसले, उमेश पाटील, वैजनाथ चौगुले, शांताराम कडोलकर, पी. ओ. धामणेकर, शिवानंद कोरे, परशराम यळ्ळूरकर आदी सदस्य उपस्थित होते.
