बेळगाव : विश्वभारत सेवा समिती संचलित माध्यमिक विद्यालय कर्ले ता. बेळगाव येथे दि. 14 फेब्रुवारी 2022 रोजी पालक, शिक्षक, विद्यार्थी मेळावा संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष किणये ग्रामपंचायत सदस्य श्री. विनायक रावजी पाटील हे होते. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागतगीताने करण्यात आली. प्रास्ताविक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक पी. आर. सांबरेकर यांनी केले. सरस्वती प्रतिमेचे पूजन उपस्थित मातांच्या हस्ते करण्यात आले.
पालक यशवंत मोरे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत वेळेचे महत्व, अभ्यासाची गरज व आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. शाळेचे विज्ञान शिक्षक गजानन तंगनकर यांनी विद्यार्थ्यांना सोने, चांदी, तांबे व लोखंड याची वेगवेगळी उदाहरणे देऊन प्रत्येक विद्यार्थी त्याच्यापरिने खूप मोलाचा आहे. त्याबरोबरच शिक्षक व पालक यांचे मार्गदर्शन किती महत्त्वाचे आहे हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
अध्यक्षीय भाषणात श्री. विनायक रावजी पाटील म्हणाले, शिक्षण हा जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये शिक्षणाचे महत्त्व ओळखून वार्षिक परीक्षेच्या दृष्टिकोनातून वेळापत्रकाचे नियोजन करून अभ्यास करावा. विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. थोर व्यक्तींच्या जीवनातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन आपले भविष्य उज्वल करावे.
या कार्यक्रमासाठी कर्ले, कावळेवाडी, जानेवाडी, नावगे, बेटगिरी, बाकनूर व बहाद्दरवाडीचे पालक वर्ग व शाळेतील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शाळेतील शिक्षक एम. बी. हुलमनी, एम. एन. पाटील, व्ही. ए. पाटील, पी. एस. तारीहाळकर व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती के. एम. सातेरी यांनी केले तर आभार प्रदर्शन के. जी. मेणसे यांनी केले.
Check Also
आनंदनगर नाल्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न
Spread the love बेळगाव : आनंदनगर – वडगाव येथील नाल्याचे बांधकाम खासगी जागेतून का करण्यात …