बेळगाव : काँग्रेस अधिवेशनातर्फे येत्या मंगळवार दि. 21 रोजी क्लब रोड, बेळगाव येथील सीपीएड मैदानावर आयोजित केल्या जाणाऱ्या जय बापू, जय भीम, जय संविधान अधिवेशनादरम्यान सुरळीत रहदारीसाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. त्यांना पर्यायी मार्गाची सूचना करण्यात आली आहे असे बेळगाव शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी कळविले आहे.
काँग्रेस अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पुढील वाहतूक नियम लागू होतील. प्रतिबंधित प्रवेश : दि. 21 जानेवारी 2025 रोजी पुढील मार्गांवर फक्त अधिवेशनाला येणाऱ्या वाहनांनाच परवानगी असेल- चन्नम्मा सर्कल, क्लब रोड, गांधी सर्कल, शौर्य सर्कल, शरकत पार्क आणि ग्लोब थिएटर रोड.
इतर वाहनांना श्री शनि मंदिर किंवा भातकांडे शाळेचा मार्ग वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दि. 21 जानेवारी 2025 रोजी सकाळी 5 वाजल्यापासून ते अधिवेशन संपेपर्यंत कोणत्याही दिशेकडून शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व अवजड वाहनांना शहराच्या हद्दीत प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे.
पार्किंग व्यवस्था
चन्नम्मा सर्कल येथून कॉलेज रोड मार्गे संमेलनात सहभागी होणाऱ्यांसाठी वाहतूक करणाऱ्या वाहनांनी प्रवाशांना चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड, यंदे खुट, देशपांडे खुट आणि म. गांधी सर्कल येथे सोडावे या वाहनांसाठीचे पार्किंग शौर्य सर्कल मार्गे प्रवेश करण्यायोग्य बेवूर रोडवर उपलब्ध असेल, असे बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी कळविले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta