बेळगाव : फरार झालेल्या पत्नीला ताब्यात देण्याची मागणी करण्यासाठी काही दिवसांपूर्वी पोलिस ठाण्यात गेलेल्या एका व्यक्तीच्या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे.
बेळगाव तालुक्यातील मारिहाळ येथे एका महिला ग्रामपंचायत सदस्याने पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन केले. तसेच आपला पती हा एका परस्त्रीशी विवाहबाह्य संबंध ठेवून आपल्या मुलांना घेऊन गेला आहे. त्यामुळे आता पोलिसांनीच आपल्या पतीला आणि मुलांना परत मिळवून द्यावे अशी मागणी करून मरिहाळ ग्रामपंचायत सदस्या वाणीश्री यांनी मरिहाळ पोलीस ठाण्यासमोर धरणे दिले. मला आमचा नवरा आणि मुले हवी आहेत. न्याय मिळेपर्यंत येथून हलणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
वाणीश्रीचा नवरा बसवराज हा मुसाबी नावाच्या एका विवाहित महिलेसोबत पळून गेला आहे. अशी त्यांची तक्रार आहे. मुसाबीसोबत पळून गेलेला तिचा पती बसवराज काल दोन्ही मुलांना आपल्या सोबत घेऊन गेला. त्यामुळे आता आपल्याला पती आणि मुले मिळवून द्यावी अशी मागणी वाणीश्री यांनी केली.