Monday , September 21 2026
Breaking News

पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू

Spread the love

 

धर्मट्टी गावातील दुर्दैवी घटना; परिसरात हळहळ

मुडलगी : मुडलगी तालुक्यातील धर्मट्टी गावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

मृत भावांची नावे सागर बाबू मादार (वय १५) आणि प्रवीण बाबू मादार अशी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी दोघे भाऊ गावाजवळील ओढ्याकडे गेले होते. यावेळी धाकटा भाऊ पाण्यात उतरला असता तो बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी मोठा भाऊ पाण्यात उतरला. मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने ते पाण्याच्या खोल भागात जाऊन बुडाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि बचाव पथकाने शोधमोहीम राबवून दोघांचे मृतदेह बाहेर काढले. या दुर्दैवी घटनेमुळे मदार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

या प्रकरणी मुडलगी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *