
बेळगाव : प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत बेळगावमधील काही नागरिक जखमी झाले आहेत. कुंभमेळ्यासाठी गेलेल्या भाजपच्या दोन महिला कार्यकर्त्या तसेच दोन मुली जखमी झाल्या असल्याचे वृत्त हाती आले आहे.
जखमी झालेल्या भाजप कार्यकर्त्यांची नावे सरोजिनी नंदूविनळ्ळी (रा. कुपेम्पू नगर) आणि कांचन कोपर्डे (रा. शेट्टी गल्ली) कांचन कोपर्डे यांच्यासमवेत त्यांचे पती अरुण हेही जखमी असल्याचे समजते तसेच मुली मेघा आणि ज्योती देखील जखमी झाल्या. त्यांच्यासह आणखी काहीजण तीन दिवसांपूर्वी प्रयागराजला गेले आहेत.
तिथे डॉक्टरांनी चौघांवरही उपचार केले. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती नातेवाईकांना देण्यात आली आहे. महाकुंभात सहभागी होण्यासाठी बेळगावहून ५०० हून अधिक यात्रेकरू रवाना झाले आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta