Sunday , September 20 2026
Breaking News

अभिजात मराठी संस्था आयोजित दोन दिवशीय आनंद मेळावा बेळगावात; सर्व मराठी संस्थांना आवाहन

Spread the love

 

बेळगाव : मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम व भाषा विषयक इतर उपक्रम राबविण्यासाठी अभिजात मराठी संस्था, बेळगाव या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या वतीने मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून दोन दिवशीय सांस्कृतिक मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.
मराठा मंदिर, बेळगाव येथे गुरुवार दि. 27 व शुक्रवार दि. 28 फेब्रुवारी रोजी हा मेळावा संपन्न होईल. हा एक सांस्कृतिक उत्सव असून यात ग्रंथदिंडी, उद्घाटन, निमंत्रितांचे कवी संमेलन, विद्यार्थ्यांचे कथाकथन आणि कवी संमेलन, विद्यार्थी आणि शिक्षक- पालक मेळावा, पुस्तक प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, अभिजात नाट्य संगीताचा कार्यक्रम, मंगळागौरीचे खेळ अशा अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखक, पत्रकार , भाषातज्ञ, नाटककार डॉ. श्रीपाद जोशी, नागपुर आणि पुण्याच्या सुप्रसिद्ध शिक्षण तज्ञ, बालकुमार साहित्य लेखिका स्वाती राजे या उपस्थित राहुन विद्यार्थी, पालक व शिक्षकाना मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमात बेळगाव व खानापूर मधील सर्व मराठी संस्था, वाचनालय, सोसायटी, बँका, मराठी शाळा, साहित्यिक मंडळे व सांस्कृतिक संस्था, व्यापारी, उद्योजक आणि परिसरातील मराठी शाळा, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी या सर्वांना समाविष्ट करून घेतले जात आहे.
या दोन दिवसात भाला, बरची, काठी फिरवणे यांचे प्रात्यक्षिकही दाखविले जाणार आहे. बेळगाव आणि परिसरातील सर्व मराठी संस्थांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे तरीही सर्व संस्थांनाआवाहन करण्यात येत आहे की त्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे अधिक माहितीसाठी या संस्थेच्या अध्यक्ष डॉ. संध्या देशपांडे व कार्यवाह अनंत लाड यांना 9243222140 किंवा 9448357544 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *