
बेळगाव : येथील वीर सौध योगा केंद्र, टिळकवाडीतर्फे जागतिक सूर्यनमस्कार दिन व रथसप्तमी उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी उषाताई दळवी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्रार्थना व श्लोक, अग्नीहोत्र झाल्यानंतर सूर्य नमस्कार घालण्यात आले.
यावेळी सदस्य वाय पी नाईक यांनी नियमितपणे सूर्य नमस्कारामुळे आपले आरोग्य निरोगी रहाते. व्यायामात सातत्य हवे त्यामुळे शांत, समाधान आत्मविश्वास, मानसिक बळ मिळते. सूर्य किरणांनी अवघी सृष्टी तेजस्वी सामर्थ्यवान बनते सूर्याला दंडवत घालणे, कृतज्ञतेने आपण ही रथसप्तमी जागतिक स्तरावर साजरी केली जाते. आपण नेहमी योगासने प्राणायाम करावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उमेश सुपाले, शोभा दुर्वे, रवींद्र सुतार, दीपा चौगुले, वर्षा शानबाग, स्मिता निंबाळकर आदी सदस्य उपस्थित होते.
हा कार्यक्रम प्रशिक्षक गोपाळराव देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. आभार दत्तात्रय कुरवीनकोप यांनी मानले.

Belgaum Varta Belgaum Varta