Monday , September 21 2026
Breaking News

हिरेबागेवाडीजवळ झालेल्या भीषण अपघातात मुडलगी येथील डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : पुणे – बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील हिरेबागेवाडीजवळ आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एक महिला डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला. आशा कोळी (वय ३२ रा. सांगणेकेरी ता. मुडलगी) असे मृत महिला डॉक्टरचे नाव आहे. तर कारमधून प्रवास करणाऱ्यांपैकी आशा कोळी यांचे पती डॉ. भीमाप्पा कोळी व चालक महेश खोत हे गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार कार ट्रकच्या मागील बाजूस आदळल्याने कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. धारवाडहून बेळगावच्या दिशेने येत असताना हिरेबागेवाडीजवळ हा अपघात झाला. जखमींना बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *