बेळगांव : कोल्हापूर येथे प्रसिद्ध कवी प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार यांच्या “सृजनगंध ” या बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेची समिक्षा असलेल्या ग्रंथास नुकताच करवीर साहित्य परिषदेचा संकीर्ण विभागाचा प्रथम क्रमांचा पुरस्कार प्राप्त झाला. रोख रक्कम, प्रमाणपत्र, स्मूर्तीचिन्ह, ग्रंथ भेट, पुष्पगुच्छ असे सत्काराचे स्वरूप असून पुणे येथील आत्मदर्शन संस्थेचे संस्थापक प्रा. डॉ. संजीव कुलकर्णी, प्रा. एम. बी. शेख, संत गाडगे बाबा महाराज अध्यासानाचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. रा. तु. भगत, प्रा. किसनराव कुराडे आदीच्या उपस्थित पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी तालुका चंदगड येथे कवी प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार येथे कार्यरत असून त्यांचे कविता, समिक्षा, अशा विविध प्रकारचे लेखन त्यांनी केले आहे. “सृजनगंध” या ग्रंथास हा सातवा पुरस्कार असून यापूर्वी शिवम पुरस्कार कोल्हापूर, / शब्दांगण पुरस्कार चंद्रपूर, / अक्षरसागर पुरस्कार गारगोटी, / समिक्षा रत्न पुरस्कार पंढरपूर, / मातृ मंदिर संस्था पुणे,/ भी. ग. रोहमारे पुरस्कार कोपरगांव असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या “स्वप्नांच्या पडझनीनंतर” हा काव्य संग्रह कर्नाटक विश्वविद्याल धारवाड येथे अभ्यासक्रमात असून त्यांना अनेक मान्यवर संस्थांचे पुरस्कार प्राप्त आहेत. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे; त्यांचे सीमाभागातील साहित्य चळवळीत मोठे योगदान आहे.
संत गाडगे बाबा महाराज अध्यासानाचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. रा. तु. भगत म्हणाले ; महाराष्ट्राच्या जडणघडणीत संतांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांनी येथील माणसांच्या मनांची मशागत केली. संतांनी खऱ्या अर्थाने सामाजिक समतेची, बंधुभावाची शिकवण दिली. अनेक संतांनी धर्माचे खरे तत्त्वज्ञान आचरून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. जातिभेदविरहित समाजाचा पुरस्कार तसेच स्त्रियांना धार्मिक स्वातंत्र्य बहाल करून संतांनी आध्यात्मिक लोकशाही स्थापन केली होती.देशातील विविध राज्यांमध्येच नव्हे तर परदेशातही संत परंपरा आहे पण महाराष्ट्रातील संत परंपरेचे महत्त्व वेगळे आहे. येथील संतांनी लोकशाहीची शिकवण दिली. लोकशाही म्हणजे लोकांचे अधिकार व कर्तव्य यांची जाणीव असणे. संतांनी आपल्याला धार्मिक अधिकार व कर्तव्याची जाणीव करून दिली. माणसामधील अंतर्यामी असणारा भक्तिभावच महत्त्वाचा आहे. संतांनी मनाची मशागत करून आध्यात्मिक जनजागृती केली. सामान्य माणसाला त्याच्या मराठी प्राकृत भाषेत कळेल असा वारकरी पंथ स्थापन केला व धर्माचा खरा अर्थ समजावून देण्याचा प्रयत्न केला.महाराष्ट्राच्या जडणघडणीत संतांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांनी येथील माणसांच्या मनांची मशागत केली. संतांनी खऱ्या अर्थाने सामाजिक समतेची, बंधुभावाची शिकवण दिली. महाराष्ट्रात वारकरी, नाथ, महानुभाव, श्री दत्त, गणेश, देवी असे वेगवेगळे संप्रदाय असून त्यातील संतांची थोर परंपरा आहे़ महाराष्ट्राच्या जडण-घडणीत संतांचे योगदान मोठे असून, समाजाच्या हितासाठी प्रसंगी त्यांनी बंडखोरीही केली़ संतांचे विचार व आचार यामुळेच सामाजिक एकता टिकून राहिल्याचे दिसून येते.