बेळगाव : वाहन नोंदणी फलकावर नियमबाह्यपणे कोणत्याही संघ संस्थांचा उल्लेख अथवा चिन्ह आढळून आल्यास अशा वाहनांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल, शिवाय सदर वाहन जप्त करण्यात येईल असा इशारा बेळगाव परिवहन अधिकारी शिवानंद मगदूम यांनी दिला. शुक्रवारी बेळगावमधील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हि माहिती दिली आहे. वाहन नोंदणी क्रमांक फलकावर नियमबाह्यपणे कोणत्याही संघ संस्थांचा उल्लेख अथवा चिन्ह आढळून आल्यास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परिवहन विभागातर्फे कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.
बीबीएमपी, बीडीओ, केएचपी, केएचएफसी, एमएसआयएल, केपीटीसीएल, बेसकॉम यासह कोणत्याही संघ संस्थांचा उल्लेख नंबरप्लेटवर आढळून आल्यास तातडीने सदर वाहन जप्त करण्यात येईल आणि सदर वाहन कोणत्याही तत्वावर परत दिले जाणार नाही, याव्यतिरिक्त कायदेशीर कारवाईही करण्यात येईल, अशी माहिती मगदूम यांनी दिली. यासंदर्भात एक तपास पथक तयार करण्यात येणार असून बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात या कारवाई अंतर्गत चार वाहनांवर असलेले नामफलक हटविण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त सुवर्णसौध परिसरात देखील कारवाई करण्यात आली आहे. कोणीही नियमांचे उल्लंघन करू नये, असे आवाहन शिवानंद मगदूम यांनी केले. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून वाहन चालविणे गरजेचे असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिवानंद मगदूम यांनी दिला.
Check Also
युवा आघाडीतर्फे उद्या सैन्यात भरती झालेल्या जवांनाचा सत्कार
Spread the love बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीच्या वतीने उद्या बुधवार दिनांक …