बेळगाव : मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यास पात्र आहे. यामुळे केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा त्वरित द्यावा अशी मागणी एका प्रस्तावाद्वारे बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली.
पत्रकार संघातर्फे रविवारी झालेल्या मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात ही मागणी करण्यात आली. अध्यक्षस्थानी कृष्णा शहापूरकर होते.
सुरुवातीला ज्येष्ठ पत्रकार ऍड. नागेश सातेरी यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला दिलेल्या योगदानाचा यावेळी गौरवपूर्वक उल्लेख करण्यात आला.
कार्यवाह शेखर पाटील यांनी आभार मानले.
पत्रकार भवनात झालेल्या या कार्यक्रमास सदानंद सामंत, सुहास हुद्दार, महेश काशीद, विलास अध्यापक, राजेंद्र पोवार, गुरुनाथ भादवणकर, ऍड. अजय सातेरी, मधु पाटील आदी उपस्थित होते.
Check Also
उद्यापासून सार्वजनिक वाचनालयाची बॅ. नाथ पै व्याख्यानमाला
Spread the love बेळगाव : 176 वर्षाची परंपरा असलेल्या येथील सार्वजनिक वाचनालय, या संस्थेच्यावतीने आयोजित …