बेळगाव : श्रीरामनवमी निमित्त बेळगाव शहरात 6 एप्रिल रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, शहापूर या मार्गावर ही शोभायात्रा काढण्यात येणार आहे. हिंदू संस्कृती आणि परंपरेचा जागर करणाऱ्या या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी केले आहे.
श्रीरामनवमी निमित्त बेळगावमध्ये रविवार 6 एप्रिल रोजी श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी दुपारी चार वाजता या शोभा यात्रेची सुरुवात होणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, शहापूर या मार्गावर ही शोभायात्रा पार पडणार असून, बेळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या संदर्भात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि रामभक्त उपस्थित होते. यावेळी श्रीरामनवमी शोभायात्रा भव्य आणि अविस्मरणीय करण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, असे रमाकांत कोंडुस्कर यांनी केले.
याच वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी शिवभक्त रजत हुलजी (तुडये, चंदगड) यांनी आपले विचार मांडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणादायी इतिहासाचा उल्लेख करत, त्यांनी उपस्थितांना एकजूट राहण्याचे आणि परंपरा जोपासण्याचे आवाहन केले. आयोजकांनी सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.