बेळगाव : काकती-होनागा येथे दोन गटांमध्ये झालेल्या मारामारी संदर्भात फिर्याद देण्यासाठी गेलेल्या फिर्यादीना पोलिसांनी अमानुष मारहाण करणाऱ्या काकती पोलिसांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी होनगा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
होनगा येथे काल दोन गटांमध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादवादीचे पर्यवसन मारामारीत झाले. त्यामध्ये काहीजण जखमी झाले आहेत. या मारामारीसंदर्भात रितसर तक्रार नोंदविण्यासाठी होनगा ग्रामस्थ काल काकती पोलीस स्थानकात गेले होते पण तक्रार नोंदवून घेण्याऐवजी पोलिसांनी फिर्यादीनाच मारबडव केल्याचा आरोप केला आहे. वास्तविक पोलिसांनी समाजात शांतता राखली पाहिजे तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेऊन योग्य तो क्रम घेणे अपेक्षित होते मात्र तसे न करता पोलिसांनी आमच्यावरच हल्ला करून मारबडव केली आहे, अशी तक्रार परशुराम, हनुमंत, भैरू, लक्ष्मण बजंत्री यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे. घडल्या प्रकारची चौकशी न करता दलित तक्रारदारांना अशी मारहाण करणे निंदनीय आहे, असे फिर्यादीनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
Check Also
युवा आघाडीतर्फे उद्या सैन्यात भरती झालेल्या जवांनाचा सत्कार
Spread the love बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीच्या वतीने उद्या बुधवार दिनांक …