बेळगाव : बेळगाव महापालिका पौरकार्मिक संघाच्या वतीने काल सोमवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
शहापूर बॅरिस्टर नाथ पै चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला बेळगावचे महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, मनपा आयुक्त शुभा, मनपा अधिकारी उदय तळवार, नगरसेवक रवी साळुंखे, नितीन जाधव, गिरीश धोंगडी यांच्यासह अन्य नगरसेवक नगरसेविका आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापौर मंगेश पवार म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिन दलितांसाठी आपले जीवन वेचले. प्रत्येकाने त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन जीवनाची वाटचाल करावी असे आवाहनही त्यांनी केले. मनपा आयुक्त शुभा, नगरसेवक रवी साळुंखे यांनीही समायोचित विचार मांडले. पौरकार्मिक संघाच्या वतीने यावेळी उपस्थित मान्यवरांचा पुष्प, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.