Monday , June 17 2024
Breaking News

वन्यजीवींच्या संरक्षणासाठी प्रयत्न करा : जिल्हाधिकारी हिरेमठ

Spread the love

जागतिक वन्यजीव दिन साजरा
बेळगाव : वनविभाग व वन्यजीव परिसर विकास संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने गुरुवारी जागतिक वन्यजीव दिन साजरा करण्यात आला वनविभागाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य वनसंरक्षक अधिकारी विजयकुमार सालीमठ उपस्थित होते.

व्यासपीठावर जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ उपवन संरक्षण अधिकारी जी. पी. हर्षभानू, सामाजिक वनीकरण विभागाचे शिवानंद नाईकवाडी, शंकर कल्लोळकर, वन्यजीव परिसर विकास संघाचे अध्यक्ष सुरेश दुर्बिनट्टी, सचिव डॉ. डी. एन. मिसाळे आदी उपस्थित होते.

प्रारंभी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ व मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे शुभारंभ करण्यात आला. यानंतर उपस्थित मान्यवरांना पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. स्वागत व परिचय सुरेश दुर्बिनट्टी यांनी केले. यावेळी उल्लेखनीय कार्य केलेल्या विभागाच्या अधिकार्‍यांचा वनक्षेत्रपाल यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ म्हणाले, वनविभागाबरोबर प्रत्येक नागरिकाने वन्यजीवांच्या संरक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजे शिवाय समाजात आणि वनक्षेत्राबाबत जागृती केली पाहिजे. जिल्ह्यात 18 टक्के वनक्षेत्र आहे त्यामध्ये तीन टक्क्यांनी वाढ झाली पाहिजे. त्याला अनुदान देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे सांगितले.
विजयकुमार सालीमठ हे आपल्या भाषणात म्हणाले, प्राणी पक्षी कीटक वृक्ष अशी विविधता आहे. मात्र मनुष्याकडून निसर्गातील पशुपक्ष्यांची हत्या केली जात आहे पण हे गले तर आपण ही जगणार आहोत ही भावना रुजविणे आवश्‍यक आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी वनविभागाचे अधिकारी वनक्षेत्रपाल वनसंरक्षक व कर्मचारी उपस्थित होते. साळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

मर्कंटाईल सोसायटीला जॉईंट रजिस्ट्रार यांची भेट

Spread the love  बेळगाव : यंदा रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या दि. मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *