बेळगाव : येथील जायंट्स ग्रुप ऑफ परिवार यांच्यावतीने सालाबादाप्रमाणे मंगळवार दिनांक आठ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. सालाबादप्रमाणे या वर्षीही विविध क्षेत्रातील गुणी आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांची जायंट्स परिवार महिला दिन पुरस्कारासाठी निवड जाहीर करण्यात आली आहे.
मंगळवार दिनांक 8 मार्च रोजी दुपारी 4 वाजता शहापूर, भारत नगर लक्ष्मी रोड येथील श्री महागणपती मंदिर येथे महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध उद्योजक वेंकटेश सरनोबत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याच हस्ते ज्येष्ठ महिला सुनंदा निलजकर, पोस्ट वुमन सविता जोळद, स्वच्छता कर्मचारी सुरेखा कांबळे, सामाजिक कार्यकर्त्या मधुरा शिरोडकर, समाजसेविका मंगला पाटणकर आणि वैद्यकीय क्षेत्रात आया म्हणून कार्यरत असलेल्या लता कटारे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती जायंट्स ग्रुप ऑफ परिवारचे अध्यक्ष श्रीधन मुळीक व जायंट्स फेडरेशन माजी अध्यक्ष राजू माळवदे यांनी दिली आहे.
