केडीपी बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यासाठी मंजूर असलेले सरकारी कॅन्सर हॉस्पिटल चिक्कोडी ऐवजी बेळगावात उभारणीसाठीबाबत आज केडीपी बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलच्या बांधकामासाठी योग्य जागा शोधण्याकरिता १० दिवसांचा अवधी मागितला आहे.
बेळगाव जिल्हापालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली आज केडीपीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत विधानपरिषद सदस्य नागराज यादव यांनी अपंग विभागाकडून मंजूर व्हीलचेअरच्या वाटपातील दिरंगाईबाबत चर्चा केली. तसेच शहरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सीटी स्कॅन मशीन हलविण्याच्या आदेशाचे पालन केले आहे का, अशी विचारणा केली. यावर डीएचओ अशोक शेट्टी म्हणाले की, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सीटी स्कॅन मशीन आधीच कार्यरत आहे.
तसेच बेळगाव जिल्ह्यासाठी मंजूर असलेले कॅन्सर हॉस्पिटल चिक्कोडी ऐवजी बेळगावात बांधण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. याबाबत विधानपरिषद सदस्य नागराज यादव यांनी कारवाईबाबत विचारणा केली असता जिल्हाधिकाऱ्यांनी १० दिवसांची मुदत मागितली.
या बैठकीत कृषी विभाग, फलोत्पादन विभाग, पशुसंवर्धन, वनविभाग, रेशीम, आरोग्य यासह विविध विभागांच्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार आसिफ सेठ, दुर्योधन ऐहोळे, गणेश हुक्केरी, विश्वास वैद्य, जि. पं. सीईओ राहुल शिंदे, विधान परिषद सदस्य व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta