Monday , September 21 2026
Breaking News

बेळगावात मुली, महिला सुरक्षित आहेत काय? : भाजप नेत्या डॉ. सरनोबत यांचा सवाल

Spread the love

 

बेळगाव : दोन दिवसांपूर्वी नानावाडी येथे तीन अल्पवयीन मुलांनी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असल्याचा आरोप आहे. यामध्ये दोन मुले पोलिस कोठडीत आहेत, तर एक फरार आहे. बेळगावचे पोलिस खाते आणि प्रशासकीय संस्था काय करत आहेत, असा सवाल कर्नाटक राज्य भाजप महिला मोर्चाच्या सचिव डॉ. सोनाली सरनोबत यांनी केला आहे.

संबंधित घटनेचा संताप व्यक्त करत बेळगावात मुली आणि महिला सुरक्षित आहेत का? घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस प्रशासन शांत का आहे? गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात यावी असेही त्यांनी सांगितले.

सदर घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून, फरार आरोपीला लवकरात लवकर पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पुढील तपास टिळकवाडी पोलीस करत आहेत.

 

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *