बेळगाव : सकल मराठा समाजाच्या वतीने बेळगांव येथील मराठा समाजाच्या नेत्यांनी स्वराज्य संकल्प श्री शहाजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळी दावणगिरी जिल्ह्यातील होदिगीरी येथे प्रत्यक्ष भेट दिली आणि शहाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यावेळी समाधीस्थळाच्या शहाजी महाराज अभिवृद्धी सेवा ट्रस्टचे अध्यक्ष श्री. मल्लेशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि समाधी स्थळाची माहिती सांगितली. त्याचबरोबर सध्या सुरू असलेल्या समाधी स्थळाच्या परिसराची सुधारणा करण्याचे काम चालू आहे त्यामध्ये काही अडचणी येत आहेत त्यासंबंधी मराठा समाजाच्या नेत्यांशी चर्चा केली. यावेळी मराठा समाजाचे नेते किरण जाधव म्हणाले की, समाधीस्थळाचे जे कार्य होदिगीरी येथे चालू आहे त्या कार्यासाठी मराठा समाजातील प्रत्येकाने शक्य तितकी मदत करावी. त्याचबरोबर इतर शासकीय अडचणीबाबत आपण संबंधित खात्याशी बोलू असेही श्री. किरण जाधव म्हणाले.
दरम्यान, बेळगाव येथील मराठा समाजाकडून एकूण 36000 रु. चा धनादेश ट्रस्टच्या अध्यक्षांकडे सुपूर्द केला. त्यामध्ये किरण जाधव यांनी रू. 25000 तर कोंडुस्कर कुटुंबाकडूनही 11000 रू. चा धनादेश ट्रस्टकडे सुपूर्द केला.
समाधीस्थळाचे आणि परिसराचे सुशोभीकरण हे ग्रॅनाईटने करण्यात यावे, या ठिकाणी महाराजांची मूर्ती स्थापन करावी अशी सूचना शहाजी महाराज अभिवृद्धी सेवा ट्रस्टच्या अध्यक्ष मल्लेशी यांना केली.
यावेळी दत्ता जाधव, संजय कडोलकर, सुनील जाधव, सुहास हुद्दार, सागर पाटील, चंद्रकांत कोंडूस्कर, रमेश रायजादे, विशाल कंग्राळकर, केदारी करडी, राजन जाधव, यासह अन्य मराठा बांधव उपस्थित होते.
Check Also
चंदगडचे आ. शिवाजी पाटील यांना गोविंद टक्केकर यांच्याकडून शुभेच्छा!
Spread the love बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक गोविंद टक्केकर यांनी चंदगड मतदारसंघातील नवनिर्वाचित …