बेळगाव : हेस्कॉमकडून बेळगाव तालुक्यामध्ये तातडीची दुरुस्तीची कामं हाती घेण्यात आली असल्यामुळे रविवार दि. 13 मार्च रोजी बेळगाव शहर आणि ग्रामीण क्षेत्रातील कांही भागात वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे.
वडगाव विभाग वीज पुरवठा केंद्राच्या व्याप्तीतील धामणे, कुरहट्टी, मासगोनहट्टी, देवगनहट्टी, अवचारहट्टी, यरमाळ, येळ्ळूर, सुळगा, राजहंस गड, देसुर, नंदिहळ्ळी, कोंडस्कोप, हलगा, बस्तवाड या गावांसह शेतवडीतील वीजपुरवठा उद्या सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत खंडित केला जाणार आहे.
हिरेबागेवाडी विभाग वीजपुरवठा केंद्राच्या व्याप्तीतील मुतनाळ, विरनकोप्प, अरळीकट्टी, बस्सापुर, हिरेबागेवाडी, भेंडीगिरी, गजपती, अंकलगी, हुलकवी, के. के. कोप्प, खानापूर तालुक्यातील हिरेहट्टीहोळी, चिक्कहट्टीहोळी, गाडीकोप्प, चिकनूर व पारिश्वाड या गावांसह शेवाडीतील वीजपुरवठा उद्या सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत खंडित करण्यात येणार आहे.
वडगाव भाग वीज पुरवठा उपकेंद्राच्या व्याप्तीत येणार्या बाजार गल्ली, वडगाव, जुने बेळगाव, होसुर, सुभाष मार्केट, विद्यानगर, भाग्यनगर, येळ्ळूर रोड या भागात उद्या सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे.
उद्यमबाग परिसर वीज केंद्राच्या व्याप्तीत येणार्या चेंबर ऑफ कॉमर्स, गुरुप्रसाद कॉलनी, इंडस्ट्रियल, बेम्को इंडस्ट्रियल, अशोक आयर्न, अरुण इंजीनियरिंग, केएफसी, गॅलेक्सी, जीआयटी, शांती आयर्न, जैतनमाळ व भवानीनगर या परिसरात उद्या रविवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वीज खंडित केली जाणार आहे.
तरी उपरोक्त भागातील नागरिक आणि शेतकर्यांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन हेस्कॉमने केले आहे.
Check Also
आनंदनगर नाल्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न
Spread the love बेळगाव : आनंदनगर – वडगाव येथील नाल्याचे बांधकाम खासगी जागेतून का करण्यात …