
बेळगाव : मागील दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे आनंद नगर दुसरा क्रॉस येथे तलाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागाला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे त्यामुळे नागरिकांना ये- जा करणे अवघड झाले आहे. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्यामुळे पायी चालत जाणाऱ्यांना तसेच दुचाकीस्वारांना ये- जा करणे कठीण बनले आहे. मागील एक वर्षापासून वादात अडकलेल्या अपूर्ण नाल्यामुळे पाण्याचा मोठा प्रवाह ओमकार नगर, समृद्धी कॉलनी, तिसरा क्रॉस आनंद नगर या भागातून आनंदनगर दुसरा क्रॉस येथील रस्त्यातून वाहत आहे. त्यामुळे पावसाचे पाणी अनेकांच्या घरात शिरले आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंचे देखील नुकसान झाले आहे. वारंवार मागणी करून देखील प्रशासनाने नाला निर्मितीच्या भोंगळ कारभाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे आनंद नगरवासीयांवर पूर सदृश्य परिस्थितीला सामना करण्याची वेळ आली आहे त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta