
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/
——————————————————————
——————————————————————-
बंगळुरू : राज्यात कायदा आणि सुव्यवस्था योग्यरित्या राखली जात नसल्याच्या विरोधकांच्या आरोपांदरम्यान राज्य सरकारने ३४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.
बंगळुरूमध्ये राज्य पोलिस विभागाच्या विविध विभागांमध्ये मोठी उलथापालथ करण्यात आली आहे, ज्यात गुन्हे विभाग आणि वाहतूक विभाग यांचा समावेश आहे.
बेळगावचे डीसीपी रोहन जगदीश यांची गदग जिल्ह्याचे एसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांची (पदांची) माहिती
अक्षय मच्छिंद्र – डीसीपी, बेंगळुरू मध्य विभाग
परशुराम – डीसीपी, व्हाइटफील्ड विभाग
अजय हिलोरी – सह पोलिस आयुक्त, गुन्हे विभाग
अनुप शेट्टी – डीसीपी, बेंगळुरू पश्चिम विभाग, वाहतूक
कार्तिक रेड्डी – सह पोलिस आयुक्त, वाहतूक विभाग
जयप्रकाश – बेंगळुरू उत्तर वाहतूक विभाग, डीसीपी
शिवप्रकाश देवराजू – लोकायुक्त एसपी, बेंगळुरू
एम. नारायण – इलेक्ट्रॉनिक सिटी विभाग, डीसीपी
सैदालु अदावत – सीआयडी, एसपी
अनिथा.बी. हड्दनावर – डीसीपी, बेंगळुरू दक्षिण पूर्व विभाग
बाबा साब न्यामागौडा – बेंगळुरू उत्तर विभाग, डीसीपी
श्रीहरी बाबू – बेंगळुरू सीसीबी डीसीपी
नागेश – बेंगळुरू उत्तर पश्चिम विभाग, डीसीपी
सौम्यलता – सीएआर मुख्यालय, डीसीपी
एम.एन. अनुचेत – डीआयजी भरती विभाग
वर्तिका कटियार – डीआयजी, बेल्लारी झोन
शंथाराजू – एसपी, गुप्तचर विभाग
सिरीगोवरी – एसपी, राज्य गुन्हे नोंद विभाग
सुमन.डी. पेन्नेकर – डीसीपी, गुप्तचर
सिमी मारिया जॉर्ज – डीसीपी, दक्षिण विभाग वाहतूक
वाय. अमरनाथ – कमांडंट पहिली बटालियन केएसआरपी
यशोधा वट्टागोडी – एसपी, हवेरी
गुंजन आर्य – एसपी, धारवाड
एम. गोपाल – संयुक्त संचालक, एफएसएल बंगळुरू
सिद्धार्थ गोयल – एसपी, बागलकोट
रोहन जगदीश – एसपी, गदग
शिवंशू राजपूत – एसपी, केजीएफ
जितेंद्र कुमार – डीसीपी कायदा आणि सुव्यवस्था, मंगलोर नगर
एम.एन. दीपन – एसपी, उत्तर कन्नड
एस. जानवी – एसपी, विजयनगर
राज्यात तुरुंगात बेकायदेशीर कृत्यांसह विविध अनियमितता घडत असल्याच्या बातम्या येत होत्या. या पार्श्वभूमीवर, विरोधी पक्षांनी राज्यात कायद्याची अंमलबजावणी योग्यरित्या केली जात नसल्याचा आरोप केला होता.
Belgaum Varta Belgaum Varta