
बेळगाव (वार्ता) : आज सोमवारी दि. 2 ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊच्या दरम्यान वडगाव-येळ्ळूर वेस बसस्थानकाजवळ अज्ञात मारेकऱ्यांनी एकावर प्राणघातक हल्ला करून धारदार हत्याराने गळा चिरून खून केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ माजली आहे. सदर व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.
महादेव जाधव वय अंदाजे 55 रा. भारतनगर, वडगांव असे मयत इसमाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महादेव जाधव हे भारतनगर वडगांव येथे आपल्या बहिणीच्या घरी रहात होते. सोमवारी सकाळी येळ्ळूर बसस्थानकाजवळील रिक्षा स्थानकाजवळ त्यांचा धारदार हत्त्याराने वार करून खून करण्यात आला. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.
हा खून नेमक्या कोणत्या कारणासाठी झालाय आणि कुणी केलाय याचा तपास सुरू आहे या भागात काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता.