बेळगाव : मालतीबाई साळुंखे हायस्कूल टिळकवाडीमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्याचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. के. एन. मन्नोळकर सर होते. प्रमुख अतिथी माधुरी जाधव फाऊंडेशनच्या संस्थापिका सौ. माधुरी जाधव, सौ. स्मिता शिंदे, शुभम दळवी, श्री. मंगेश देवलापूरकर, समाजसेवक श्री. शांताराम कडोलकर व सर्व शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागतगीताने करण्यात आली. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावर्षीचा आदर्श विद्यार्थिनीचा बहुमान कुमारी ज्ञानेश्वरी विनोद अनगोळकर हिला देण्यात आला. यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत मांडले. त्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांना उद्देशून प्रमुख पाहुणे व शिक्षकांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती व्ही. एम. खोत यांनी केले व आभार प्रदर्शन श्रीमती पी. होनुले यांनी केले.
Check Also
विद्या प्रसारक शिक्षण मंडळाच्या 55 व्या वर्षपूर्ती निमित्त शोभायात्रेचे आयोजन; प्रसिद्ध गायिका बेला शेंडे प्रमुख आकर्षण
Spread the love बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात मोठी प्रगती करीत असलेल्या एसपीएम …