बेळगाव : बेळगावची कन्या आणि आंतरराष्ट्रीय जुडो खेळाडू तसेच प्रशिक्षक रोहिणी पाटील यांच्या नेतृत्वाखालील राणी चन्नम्मा विश्वविद्यालयाचा महिलांचा जुडो संघ कानपूर येथे होणाऱ्या आंतर विश्वविद्यालय जुडो स्पर्धेसाठी रवाना झाला आहे.
शनिवारी सकाळी बेळगाव रेल्वे स्थानकावरून बेळगावच्या जुडो गर्ल्स कानपुरकडे रेल्वेद्वारे रवाना झाल्या आहेत. उत्तर प्रदेश मधील कानपूर इथल्या छत्रपती शाहू महाराज विश्वविद्यालयात
आंतर विश्वविद्यालय राष्ट्रीय जुडो स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे त्या स्पर्धेत हे बेळगावचे खेळाडू सहभागी होणार आहेत खेळाडूंना कोच रोहिणी पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
बेळगावच्या महिला जुडो संघात रम्या जिरली, सारिका केसरकर, रोहिणी, अक्षता सुंकद, सहाना एस आर आणि आदिती परब या रवाना झाल्या असून वेगवेगळ्या गटांमध्ये बेळगावच्या राणी चन्नम्मा विश्वविद्यालयाचे प्रतिनिधित्व जुडो खेळामध्ये करणार आहेत.
![](https://belgaumvarta.com/wp-content/uploads/2022/03/IMG-20220319-WA0060-1068x785-1-660x330.jpg)