बेळगाव : दरवर्षीप्रमाने कै.नारायणराव गुंडोजी जाधव सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठान नवी गल्ली शहापूर-बेळगाव यांच्यावतीने रंगीबेरंगी फुले उधळून रंगपंचमी साजरी करण्यात येणार आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक गणेशपूर गल्ली गाडेमार्ग कॉर्नर येथे मंगळवार दिनांक 22 मार्च रोजी सकाळी 8.30 वाजता आयोजित केलेल्या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते, युवक मंडळे व नागरिकांनी उपस्थित राहून प्रदूषणमुक्त रंगपंचमी उपक्रमास पाठिंबा द्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मान्यवर सामाजिक कार्यकर्ते आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
Check Also
बिजगर्णी शिक्षण संस्थेबाबत आदेशाला स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
Spread the love पश्चिम विभाग शिक्षण मंडळाचा वाद बेळगाव : बिजगर्णी येथील पश्चिम विभाग शिक्षण …