Saturday , July 27 2024
Breaking News

2 ए राखीवता, सुवर्ण विधानसभेसमोर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह विविध मागण्यांसाठी बेंगलोर चलो!

Spread the love


बेळगाव : कर्नाटकातील मराठा समाजाला 3- बी मधून 2-ए राखीवता द्यावी, बेळगावच्या सुवर्ण विधानसौध समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करावा आणि श्रीमंत पाटील यांना मंत्रीपद द्यावे या मागण्यांसह अन्य मागण्या 31 मार्चच्या आत न सोडल्यास एप्रिल 4 पासून विजयपूर पासून बेंगलोर चलो रॅली आयोजित करण्यात आली असून 8 एप्रिल रोजी बेंगलोरच्या फ्रीडम पार्कमध्ये धरणे सत्याग्रह होणार असल्याचे कर्नाटक क्षत्रिय मराठा संघाचे राज्य अध्यक्ष श्यामसुंदर गायकवाड यांनी येथे बोलताना सांगितले.
कॉलेज रोड येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. राज्यात भाजप सरकार सत्तेवर येताच संपूर्ण मराठा समाजाला 3-बी मधून 2-ए या प्रवर्ग जातीमध्ये समाविष्ट करण्यात येईल अशी घोषणा करून बी. एस. येडीयुराप्पा हे मुख्यमंत्री बनले. 3 वर्षाचा कालावधी संपताच बसवराज बोम्माई हे मुख्यमंत्री बनले तरीही मागण्यांची पूर्तता केली गेली नसल्याचे गायकवाड यांनी सांगून निवडणुका येताच भाजपाला केवळ मते हवीत. मात्र आता मुख्यमंत्री बोम्माईनाही समाजाचा विसर पडत असल्याचे ते म्हणाले, राज्यात लिंगायत विकास महामंडळ स्थापन केल्या गेलेल्या समाजाला मात्र मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी 500 कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे मात्र कर्नाटकात 60 लाख लोकसंख्या असलेल्या मराठा समाजाला निमित्तमात्र म्हणून मराठा विकास महामंडळाची स्थापना करण्यात 50 कोटी रुपयांचे अनुदान दिले असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
मराठा समाजाचे गुरु श्री श्री श्री विरुपाक्ष स्वामी चालना देणार असून, ही रॅली निपाणी, संकेश्वर, बेळगाव, हल्याळ, कलघटगी, हुबळी, होस्पेठ, गदग, कोप्पल, दावनगेरी मार्गे 7 एप्रिल रोजी बेंगलोरला पोहोचणार आहे तर 8 एप्रिल रोजी बेंगलोरच्या फ्रीडम पार्कमध्ये मराठा समाजाचे लोक धरणे आंदोलन कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे श्यामसुंदर गायकवाड यांनी सांगितले.
कर्नाटकाच्या प्रत्येक जिल्हा घटकांमध्ये मराठा भवन निर्माण करावे आणि मराठा विकास महामंडळाला 500 कोटी रुपयांचे अनुदान द्यावे, ते न दिल्यास 2023 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये 50 जागा तर 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत 5 जागा क्षत्रिय मराठा महासंघ लढवणार असल्याचे असल्याचा इशारा बेळगावचे माजी आमदार मनोहर कडोलकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री बसावराज बोम्माई यांना दिला.
श्री. जे. डी. घोरपडे, रविशंकर महाडिक, विठ्ठल वाघमोडे यांच्यासह क्षत्रिय मराठा महासंघाचे असंख्य नेते पत्रकार परिषदे प्रसंगी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मुसळधार पावसामुळे कडोली येथे घर कोसळले!

Spread the love  कडोली : बेळगाव तालुक्यातील कडोली गावात बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे जुने घर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *