बेळगाव : महिला सबलीकरण आज काळाची गरज आहे, असे राज्योत्सव पुरस्कारप्राप्त पर्यावरणतज्ज्ञ शिवाजी कागणीकर म्हणाले. हुक्केरी तालुक्यातील जारकीहोळी गावातील मजदूर नवनिर्माण संघ यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पाहुण्या म्हणून ‘प्रयत्न’ च्या संस्थापिका सौ. मधू जाधव यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी, महिला सक्षमीकरणाची गरज याबद्दल विचार मांडले. तसेच प्रयत्नाने समाजाच्या उन्नतीसाठी घेतलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
