उदघाटक खासदार संजयजी राऊत
साहित्यिक श्रीराम पचिंद्रे संमेलनाध्यक्षपदी निवड
स्वागताध्यक्ष साहित्यिक शरदजी गोरे
निमंत्रक सीमाकवी रवींद्र पाटील
बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषा, संस्कृतीला संजिवनी मिळावी व नवोदित कवी, लेखकांना संधी मिळावी यासाठी ही एक चळवळ म्हणून विचारपीठ आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे अंतर्गत बेळगाव शाखा आयोजित दुसरे अखिल भारतीय बेळगाव मराठी ऑनलाईन साहित्य संमेलन
रविवार दि. २५ जुलै २१ रोजी ऑनलाईन पध्दतीने सकाळी 11.00 वा. गुगलमीटव्दारे दोन सत्रात होणार आहे
यावेळी दै. पुढारीचे कार्यकारी संपादक व साहित्यिक श्रीराम पचिंद्रे संमेलनाध्यक्ष म्हणून भूषविणार आहेत तर उदघाटक म्हणून दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक, शिवसेना नेते, खासदार संजयजी राऊत असणार आहेत. स्वागताध्यक्ष अभामसाप राष्ट्रीय अध्यक्ष व साहित्यिक शरदजी गोरे यांची निवड करण्यात आली आहे.
या संमेलनाला दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार कवी डॉ.अमोल बागुल व बेळगावचे शिवसंत संजयजी मोरे विशेष अतिथी म्हणून तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय उपाध्यक्षा शुभांगीताई काळभोर व सुप्रसिद्ध साहित्यिक ज्ञानेश्वर पतंगे उपस्थित राहणार आहेत.
हे ऑनलाईन साहित्य संमेलन २५ जुलै २०२१ रोजी दोन सत्रात आयोजित केले आहे. कवी संमेलनात दर्जेदार निवड नवोदित कवींना संधी दिली जाणार आहे. हे साहित्य संमेलन सीमाभागातील पहिलेच ऑनलाईन मराठी साहित्य आहे.
दिनांक २५ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ वाजता संमेलनाला प्रारंभ होईल. दोन सत्रात संमेलन होणार आहे. गुगल मिटवर संमेलन होणार आहे. फेसबुक, युट्यूब, टेलिग्राफवर थेट प्रक्षेपण पाहू शकतात.
यावेळी संयोजक जिल्हाध्यक्ष ऍड. सुधीर चव्हाण, उपाध्यक्ष, डी. बी. पाटील, निवेदक रणजित चौगुले
अरूणा गोजे-पाटील, यांच्यासह आदी मान्यवर सहभागी होणार आहेत, अशी माहिती या संमेलनाचे निमंत्रक, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कर्नाटक प्रदेशाध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील यांनी दिली.