बेळगाव : उत्तर मतदार संघामध्ये बेळगाव शहर विकास प्राधिकरणाकडून (बुडा) राबवण्यात येत असलेली विकास कामे आणि भविष्यातील विकास कामांबाबत आमदार अॅड. अनिल बेनके यांनी आज गुरुवारी आढावा बैठक घेतली.
बेळगाव उत्तरचे आमदार अॅड. अनिल बेनके यांनी आज गुरुवारी बुडा कार्यालयांमध्ये बुडाचे अध्यक्ष, संचालक आणि अधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीत उत्तर मतदारसंघात बुडाकडून राबविण्यात येत असलेल्या विकास कामांबाबत चर्चा करण्यात आली. सध्या हाती घेण्यात आलेली कामे आणि भविष्यातील विकास कामाबद्दल आढावा घेताना आमदारांनी उद्यान -वनाचा विकास, समुदाय भवन निर्मिती, रस्ते, गटारी, डेकोरेटिव्ह लाइट्स आदींच्या कामांची माहिती घेतली.
पाण्याची समस्या दूर करण्यासाठी आवश्यक भागात बोरवेल मारून जनतेची सोय करण्याच्या दृष्टीनेही यावेळी चर्चा झाली. बैठकीस बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्यासह अध्यक्ष संजय बेळगावकर, बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे, संचालक मल्लीकार्जून सत्तीगेरी, हिरेमठ आदींसह बुडाचे अधिकारी उपस्थित होते.
Check Also
चंदगडचे आ. शिवाजी पाटील यांना गोविंद टक्केकर यांच्याकडून शुभेच्छा!
Spread the love बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक गोविंद टक्केकर यांनी चंदगड मतदारसंघातील नवनिर्वाचित …