
बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये 22 डिसेंबर हा दिवस प्रसिद्ध भारतीय गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला. यावेळी गणित विषयाला अनुसरून गणितातील कोडी, गणिती क्लृप्त्या, गणित जलद सोडविण्याच्या कल्पना, पाढ्यांची कल्पना, गणिताचे शैक्षणिक साहित्य, गणितातील कठीण भाग स्मरणात ठेवण्याच्या कल्पना, सूत्रे, भूमिती, बीजगणित यावर आधारित विद्यार्थ्यांनी साहित्य तयार करायचे होते. याची मांडणी करण्यात आली. या गणितीय संकल्पनाचे उद्घाटन शाळेतील गणित शिक्षक डी.एस्. मुतकेकर यांनी केले. दुसरी व तिसरी, चौथी व पाचवी, सहावी व सातवी, आठवी व नववी असा स्पर्धेसाठी गट केला होता. या स्पर्धेचे परीक्षण कमल हलगेकर, रुपाली हळदणकर, श्वेता सुर्वेकर यांनी केले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी.पाटील, गणित शिक्षक, शिक्षक समन्वयक सविता पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Belgaum Varta Belgaum Varta