Sunday , July 26 2026
Breaking News

श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेच्या वतीने रविवारी भव्य रक्तदान शिबीर

Spread the love

 

बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन अनगोळ राजहंस गल्ली येथील सद्गुरू सदानंद महाराज मठात रविवार दि. 28/12/2025 रोजी सकाळी 9 ते 2 वा पर्यंत करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी उपयुक्त असे उपक्रम राबविण्याची परंपरा या संघटनेने कायम जपली असून त्याचाच एक भाग म्हणून हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे.

रक्ताची गरज असणाऱ्या गरजू रुग्णांसाठी या शिबिरातून मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन होणार असून तरुण वर्गाने या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. “रक्तदान हे श्रेष्ठदान आहे” या विचारातून प्रेरणा घेत हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
श्रीराम सेना हिंदुस्थान ही संघटना सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात सातत्याने कार्यरत असते. रक्तदानासारखा समाजोपयोगी उपक्रम राबवला जात असल्याने परिसरातून या उपक्रमाचे विशेष स्वागत होत आहे.
या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन समाजासाठी योगदान द्यावे, असे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
स्थळ – सद्गुरू सदानंद महाराज मठ राजहंस गल्ली अनगोळ
दिनांक – 28/12/2025
वेळ – सकाळी 9 ते 2 वा पर्यंत

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *