Thursday , June 20 2024
Breaking News

नावगे येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन

Spread the love

बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान व राष्ट्रीय स्पोर्ट्स क्लब नावगे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष श्री. धनंजय जाधव उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना धनंजय जाधव म्हणाले, आज-काल मोबाईल युगामुळे मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होत आहे. तेव्हा गावपातळीवर तरुणांनी खो-खो, कबड्डी सारखे खेळ आयोजित करून तरुणांना आपले शरीर मजबूत व चपळ ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच शिक्षणावर सुद्धा भर द्यावा. नवनवीन उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या समाजाची शैक्षणिक व आर्थिक बाजू भक्कम करावी असे ते म्हणाले.
उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कबड्डी मैदानाचे उद्घाटन धनंजय जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य श्री. अपुनी पाटील हे होते. याप्रसंगी वकील श्याम पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य सातेरी कमती, महादेव पायानाचे, मधु खेमनाळकर, पुंडलिक पायानाचे, परशराम शहापूरकर, बाळू चिगरे, किरण बेळगावकर, बसवानी मोटनकर, मारुती हुरकडली, सहदेव मोटणकर, संजय हुबरवाडी, सुधीर माणकोजी, संजय हनबर, चांगप्पा यळ्ळूरकर, विश्वनाथ पाटील आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

ऊसाची थकबाकी अदा करण्यासाठी साखर कारखान्यांना २५ जूनपर्यंत मुदत

Spread the love  बेळगाव : जिल्ह्यातील साखर कारखान्यांना २५ जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या ऊसाची थकीत बिले अदा करण्याच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *