बेळगाव (वार्ता) : दि.१ ऑगस्ट
ते ७ ऑगस्ट हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून आचरला जातो. यानिमित्ताने गिझरे मेटर्निटी हॉस्पिटलतर्फे बेळगावचे सुप्रसिद्ध प्रसूतीतज्ञ डॉ. दत्तप्रसाद गिझरे-मंजुषा गिझरे यांचे स्तनपान आणि मातेच्या दुधाचे महत्व याविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. आई व बाळ यांच्यामधील स्तनपानाची प्रक्रिया कशी महत्वाची असते याविषयी स्लाईड शोद्वारे डॉ. दत्तप्रसाद गिझरे व्याख्यानातून सांगणार आहेत. स्लाईड शोद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम शनिवार दिनांक ७ ऑगस्ट २०२१ दुपारी ३ वाजता कॉलेज रोडवरील महिला विद्यालय (मराठी माध्यम)च्या सभागृहामध्ये आयोजित केला आहे. यावेळी निर्भीड पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत काकतीकर यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात येणार आहे.
स्तनपानासारख्या महत्त्वाच्या विषयावर व्याख्यान होणार असल्याने जास्तीत जास्त संख्येने महिलांनी उपस्थित रहावे, असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.
