बेळगाव : कचेरी गल्ली शहापूर येथील सनशाइन प्री स्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या समर कॅम्पला आज सोमवारी उत्साहात प्रारंभ झाला.
दोन ते 5 वर्षापर्यंतच्या मुला-मुलींबरोबरच इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या समर कॅम्पमध्ये, सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना डान्स, कुकिंग, ड्रॉइंग, पेंटिंग, फिजिकल फिटनेस, गेम्स अँड ऍक्टिव्हिटी, क्राफ्ट, स्विमिंग, स्केटिंग अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यास या समर कॅम्पच्या पहिल्या बॅचला आजपासून सुरू होत आहे. शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे प्रशिक्षित केले जाणार आहे. अशी माहिती सनशाइन प्री स्कूलच्या संचालिका ज्योती शिंदे यांनी यावेळी दिली.
समर कॅम्प उद्घाटन कार्यक्रमाला मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे समन्वयक शिवाजी किल्लेकर, पत्रकार श्रीकांत काकतीकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी शिक्षिका चंदा पाटील, जान्हवी पाटील, खुशबू शिरोडकर, मुरलीधर योग गुरुकुलाचे प्रशिक्षक विश्वनाथ मणगुतकर, नृत्य प्रशिक्षक आकाश यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
गुरु वंदनेने शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी ज्योती शिंदे आणि सनशाइन प्री स्कूलच्यावतीने विद्यार्थ्यांच्यासाठी हाती घेण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांबाबत कौतुक व्यक्त केले. शहापूर, वडगाव, खासबाग, बेळगाव परिसरातील विद्यार्थ्यांनी समर कॅम्पचा लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले.
