
बेळगाव : ग्रामीण भागातील खराब रस्त्यांसंदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतेमंडळींनी आज सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांची भेट घेतली.
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, ॲड. सुधीर चव्हाण आदींनी आज सोमवारी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली.
या भेटीप्रसंगी समिती नेत्यांनी ग्रामीण भागातील रस्त्यांची खराब अवस्था अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन चर्चा केली. तसेच संबंधित रस्ते युद्धपातळीवर दुरुस्त करण्याची मागणी केली. यावेळी प्रामुख्याने बडस मार्गे बाकमूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत विशेष चर्चा झाली. एकीकडे बेळगाव शहर स्मार्ट होत असतानाशहरासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी खर्चिला जात असताना बेळगाव शहरात लगतच असलेल्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था बनली आहे. अनेक रस्त्यामध्ये पावसाच्या आधी खड्डे पडलेले आहेत त्यामुळे या रस्त्यांची डागडुजी करावी किंवा नवीन रस्ते निर्माण करावे अन्यथा तालुका महाराष्ट्र समिती आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta