Sunday , July 26 2026
Breaking News

लवकरच युवा सेनेचा सीमाभागात विस्तार : सरदेसाई

Spread the love


बेळगाव : बेळगाव सीमाभागामध्ये शिवसेना कार्यरत आहे. आता लवकरच युवा सेनेचा बेळगाव सीमाभागात विस्तार केला जाईल, असे आश्वासन शिवसेनेच्या युवा सेनेचे सचिव अरुण सरदेसाई यांनी दिले.

बेळगाव शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सांबरा विमानतळावर युवा सेनेचे सचिव अरुण सरदेसाई स्वागत करून भेट घेतली असता त्यांनी हे आश्वासन दिले. कोल्हापूर दौऱ्यावर निघाले असता त्यांनी आज बेळगावला धावती भेट दिली. सरदेसाई यांच्या भेटीप्रसंगी सहसंपर्क प्रमुख अरविंद नागनुरी बेळगाव शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, तालुका प्रमुख सचिन गोरले, उपशहर प्रमुख प्रवीण तेजम, यांच्यासह अन्य पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *