Saturday , July 27 2024
Breaking News

फुल उत्पादक-व्यापारी संकटात : उद्यापासून मार्केट बंद

Spread the love

कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकारनेजारी केलेल्या लॉकडाउनमुळे बेळगावात फुलउत्पादकांना  विक्रेत्यांना मोठ्या नुकसानीला सामोरेजावे लागत आहे. विक्रीस आणलेली फुले रस्त्यावरओतून देऊन रिकाम्या हाती घरी परतण्याची वेळत्यांच्यावर आली आहे. व्यापार नसल्याने उद्यापासूनफुल मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लॉकडाउनमुळे बेळगाव होलसेल फुलमार्केट ओस पडले आहे. बाजारात आणलेली फुले ग्राहकांअभावी तशीच पडून रहात असल्याने शेतकरी आणि विक्रेत्यांनाही नुकसान सोसावे लागत आहे. लॉकडाउनमुळे लग्नसोहळे व अन्य समारंभांना बंदी आहे तर देव गाभाऱ्यात अन मंदिरे बंद अशी स्थिती आहे. त्यामुळे फुलांना मागणी नाही. परिणामी फुल उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना संकटात सापडले आहेत. फुल तोडणी आणि वाहतुकीचा खर्च निघणेही कठीण झाले आहे. त्यामुळे हताश होऊन शेतकरी गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर फुले टाकून घरी जात आहेत.

याशिवाय ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने आणि मार्केटमध्ये व्यापार होत नसल्याने उद्यापासून फुलमार्केट बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. हजारो रुपये खर्च करून, घाम गाळून कष्टाने उगवलेल्या फुलांना मागणीच नसल्याने आम्ही संकटात सापडलो आहोत. सरकारने आम्हाला किमान घासभर अन्न मिळेल एवढी तरी मदत करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

मंदिरे आणि लग्नसोहळे बंद आहेत. इतकेच नव्हे तर अंत्यसंस्कारासाठीही लोक फुले खरेदी करण्यासाठी येत नाहीयेत. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. त्यामुळे मार्केट सुरु ठेवल्यास प्रसाराचा वेग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वयंप्रेरणेने उद्यापासून फुलमार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे फुल व्यापाऱ्यांनी सांगितले.

कर्ज, उधार-उसनवार करून कष्टाने पिकवलेली फुलांना मागणी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना संकटांचा सामना करावा लागत आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी जाहीर केलेली प्रतिहेक्टरी १० हजारांची मदत आम्हाला कुठेही पुरत नाही. त्यामुळे आम्हाला योग्य मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

माजी सैनिक संघटना संघटनेतर्फे कारगिल विजयोत्सव

Spread the love  बेळगाव : माजी सैनिक संघटना संघटनेने आज कुमार गंधर्व सभागृहात कारगिल विजय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *