
खानापूर (प्रतिनिधी) : सध्या कोरोनाच्या महामारीमुळे भितीचे सावट पसरले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी खानापूर तालुक्यातील तोपिनकट्टी श्री महालक्ष्मी ग्रुपच्या व लैला शुगर फॅक्टरीच्या सौजन्याने श्री महालक्ष्मी सांसर्गिक रोग व आपत्ती निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बिदरभावी गावात कोरोनाच्या महामारीमुळे होणारा सांसर्गिक रोग थांबवावा. यासाठी कणेरी मठाचे औषध मोफत वाटण्यात आले.
यावेळी श्री महालक्ष्मी कोविड केअर सेटरचे अध्यक्ष किरण यळ्ळूरकर, सेक्रेटरी सदानंद पाटील, ग्राम पंचायत उपस्थित होते.
कोरोना काळात कणरी मठाचे औषध मोफत वाटण्यात आल्याने बिदरभावी गावात समाधान पसरले आहे.