Monday , March 17 2025
Breaking News

भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळच्यावतीने वृक्षारोपण

Spread the love

बेळगाव : भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने शामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बेळगाव ग्रामीण मंडळमध्ये दहा हजार वृक्षारोपण कार्यक्रमाला मंडळ कार्यालय विजय नगर हिंडलगा येथे प्रारंभ करण्यात आला. ह्या प्रसंगी बोलताना जिल्हा अध्यक्ष श्री. संजय पाटील म्हणाले, वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. कोरोना काळामध्ये ऑकक्सिजनचे महत्व लोकांच्या लक्षात आले आहे. तेंव्हा वृक्ष लागवड करावे असे सांगितले.

विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ म्हणाले, भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळचा हा उपक्रम अतिशय उत्कृष्ट आहे. झाडे लावण्या बरोबरच ती जगविणे तितकेच महत्वाचे आहे. पर्यावरण वाचविणे तिथकेच महत्वाचे आहे.

मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले, राजकिय पक्ष ह्या नात्याने सामाजिक कार्य. पर्यावरणचे रक्षण. कोरोना काळामध्ये जनसेवा आदि उपक्रम आम्ही राबवत आहोत. आज दहा हजार झाडे आम्ही लावत आहोत. हजारो कार्यकर्ते ह्यामध्ये भाग घेत आहेत.. ह्या प्रसंगी खासदार मंगला अंगडी, आर एस एस चे प्रमुख मुकुंदजी गोखले, हिंडलगा ग्राम पंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर आदींची भाषणे झाली. माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी आमदार श्री. मनोहर कडोलकर, विजय महेंद्रकर, दत्ता महागावकर, रामचंद्र मन्नोळकर, भाग्यश्री कोकितकर, प्रियांका आजरेकर, पंकज घाडीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचलन पंकज घाडी यांनी केले तर आभार नारायण पाटील यानी केले.

About Belgaum Varta

Check Also

सहाव्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनात डॉ. संजय कळमकर यांचे व्याख्यान

Spread the love  बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर यांच्या संयुक्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *