बेंगळूर : राज्यात ब्लॅक फंगसचे रुग्ण वाढत आहेत. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी, सरकारी रुग्णालयात आणि ‘आयुष्मान भारत आरोग्य कर्नाटक’ योजनेंतर्गत म्युकरमायकोसिस (‘ब्लॅक फंगस’) वर मोफत उपचार केले जाणार असल्याची माहिती दिली आहे. ब्लॅक फंगसचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर राज्यात सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारपर्यंत राज्यभरात १,३७० जणांना म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाला आहे. तर त्यापैकी ५१ रुग्ण मृत्य पावले आहेत.
दरम्यान, आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (केआयएमएस) च्या अधिकाऱ्यांना त्वरित अधिक म्युकरमायकोसिस रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असणारी उपकरणे खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
