Saturday , September 21 2024
Breaking News

निपाणी

सौदलगा येथे योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांची जागृती

सौदलगा : सौदलगा येथील सरकारी मराठी/ कन्नड मुला-मुलींनी शिक्षकांच्या बरोबर जागतिक योग दिनाची जागृती फेरी मोठ्या उत्साहात गावातून काढली. यावेळी 21जून घरोघरी योग, आनंदी जीवन – चांगले जिवन, झाडे लावा – ऑक्सिजन वाढवा, योग करा – आयुष्य वाढवा, आशा घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. शाळेचे मुख्याध्यापक धनंजय ढोबळेनी योगाविषयी माहिती दिली. …

Read More »

बेळगाव मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोगनोळीत तपासणी

कोगनोळी : अग्निपथ योजनेला बेळगाव येथे सोमवार तारीख 20 रोजी बंद पुकारून मोर्चा काढण्यात येणार होता. सदर बंदला व मोर्चाला जिल्हाधिकारी व पोलिस अधिकारी यांच्याकडून परवानगी मिळाली नसल्याकारणाने बेळगावमध्ये होणारा बंद व मोर्चा मागे घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कोगनोळी तालुका निपाणी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर असणाऱ्या टोल …

Read More »

मोहनलाल दोशी विद्यालयाची एस.एस.सी. परीक्षेत उज्जवल निकालाची परंपरा कायम

निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता.कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयचा एस.एस.सी. परीक्षा मार्च २०२२चा निकाल ९८.३५टक्के लागला असून उज्ज्वल निकालाची पाच दशकांची अखंड परंपरा शाळेने यावर्षीही कायम राखली आहे विद्यालयातून एकूण २४३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी २३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यामधील १०३विद्यार्थी  विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण, तर ९६ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये …

Read More »

पतीला मृत्यूच्या दाढेतून वाचविलेल्या आधुनिक सावित्रीचा गौरव

बोरगाव येथे पाटील दाम्पत्यांचा सत्कार : अष्टविनायक मित्र मंडळाचा उपक्रम निपाणी (वार्ता) : कुटुंब सांभाळत संकटकाळी आपल्या पतीस मृत्युच्या दाढेतून सुटका करण्यासाठी जेंव्हा महिला धडपडते तीच खरी सावित्री बनते. पती संदीप पाटील यांना किडनी देऊन त्यांचा प्राण वाचवलेल्या राजश्री पाटील या खऱ्या अर्थाने आधुनिक सावित्री असल्याचे जाणुन बोरगाव येथील अष्टविनायक …

Read More »

पर्यावरण वाचवा वसुंधरा वाचवा : दिलीप शेवाळे

सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल सौंदलगा या शाखेत पर्यावरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानामध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलताना न्यू सेकंडरी स्कूल भोजचे विज्ञान शिक्षक श्री. दिलीप शेवाळे सर म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्याने पर्यावरणाची काळजी घेणे गरजेचे आहे. ती घेतली तरच पृथ्वी व पृथ्वीतलावरील सर्वजण जगणार आहोत. जगातील …

Read More »

‘अग्निपथ’ विरोधात निपाणीत युवकांचा आक्रोश मोर्चा

तगडा पोलिस बंदोबस्त : तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन निपाणी (वार्ता) : संरक्षणासारख्या महत्वपूर्ण क्षेत्रात संरचात्मक बदल करणारी एखादी योजना आणली जात असेल तर तत्पूर्वी ती प्रायोगिक तत्वावर राबवणं गरजेचे आहे. ‘अग्निपथ योजने’त सहभागी होणाऱ्या युवकाना कुठलेही कायमस्वरूपी काम नसल्याने आणि सैनिकांना निवृत्तीनंतर मिळणारे इतर लाभ नाही. त्यामुळे निपाणी भागातील शेकडो युवकांनी …

Read More »

हदनाळ-मत्तीवडे रस्त्यावर शेतकऱ्यांचे अतिक्रमण

कारवाई करण्याची मागणी कोगनोळी : हदनाळ ते मत्तीवडे या सीमाभागातील ६ किलोमीटरच्या महाराष्ट्र-कर्नाटक रस्त्यावर महाराष्ट्र हद्दीतील शेंडूर (ता. कागल) येथील काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. या मार्गावरील वाहतुकीसाठी सोईचा असणारा हा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी अडचण निर्माण होत आहे. सदर शेतकऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी हदनाळकरांनी …

Read More »

पाठ्य पुस्तकातील समस्या मार्गी लावा : राजेंद्र पवार वड्डर

शिक्षकांची गैरसोय, शिक्षण मंत्र्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : कोरोना महामारीमुळे तब्बल दोन वर्षांनी कर्नाटकातील सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. सुटीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता अत्यंत खालावली आहे. त्यांची गुणवत्ता पुन्हा वाढविण्यासोबत सन २०२२-२३ सालातील शिक्षण शिकविण्यासाठी शिक्षक तयार असताना शिक्षण विभाग आणि सरकार यांच्यात मेळ नसल्याने पाठ्य पुस्तकातील होत असलेल्या निष्काळजीपणामुळे …

Read More »

निपाणीत केएलई, रोटरीच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील के. एल. ई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पीटल आणि निपाणीतील रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने आयोजित थायरॉईड स्क्रीनिंग आणि ब्लड शुगर व एंडोक्राइनोलॉजी या आजारावर आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर रोटरी हॉलमध्ये पार पडले. त्याला रूग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये 110 रूग्णांनी सहभाग नोंदवित आरोग्य तपासणी …

Read More »

रोपांची लागवड करून साजरी केली वटपोर्णिमा

दौलतराव पाटील फाउंडेशनच्या महिलांचा उपक्रम : परंपरा व पर्यावरणाची घातली सांगड निपाणी (विनायक पाटील) : परंपरा व पर्यावरणाची सांगड घालत येथील दौलत नगरातील दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन, हेल्थ क्लब आणि जायंट्स क्लबच्या माध्यमातून वटवृक्षाच्या रोपांची निर्मिती करून महिलांनी वटसावित्री सण साजरा केला. शिवाय वृक्षारोपण करून रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करण्याचा संकल्प …

Read More »