Saturday , July 27 2024
Breaking News

निपाणी

पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक संथगतीने

  मांगुर फाट्यावरून वाहतूक बंद; पोलिसासह महसूल विभाग घटनास्थळी निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात चार दिवसापासून पडणाऱ्या दमदार पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी (ता.२६) सकाळपासूनच पावसाचा जोर वाढल्याने मांगुर फाट्यावर सेवा रस्त्यासह शेतीवाडीतील पाणी आल्याने दुचाकी स्वारांची तारांबळ उडाली. शिवाय महामार्गावरील वाहतूक मंद गतीने सुरू …

Read More »

जवाहर तलावातील गाळ काढल्यास पाणीसाठा वाढेल : पंकज गाडीवड्डर यांचे पत्रक

  निपाणी (वार्ता) : दमदार पडलेल्या पावसामुळे येथील शहरासह उपनाराला पाणीपुरवठा करणारा जवाहरलाल तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहे. दोन दिवसात तलाव ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. दरवर्षी हा तलाव भरूनही शहरवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे तलावातील गाळ काढला असता तर मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होऊन शहरवासीयांच्या पाण्याचा प्रश्न मिटला असता. पण …

Read More »

व्हटकर कुटुंबियांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील

  निपाण (वार्ता) : येथील जत्राट वेस मधील रहिवासी तिरुपती व्हटकर यांच्या अंगावर घराची भिंत कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या कुटुंबियांची परिस्थिती पूर्णतः हलाखीची आहे. त्यामुळे या कुटुंबाला शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही माजी आमदार काकासाहेब पाटील, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी दिली. पाटील …

Read More »

शेतकरी वाहनांना टोल माफी मिळावी

  रयत संघटनेची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकरी नगदी पिकासह भाजीपाल्याची पिके घेत आहेत. त्यांना भाजीपाला आणि इतर पिकांच्या विक्रीसाठी बेळगाव आणि कोल्हापुर येथील बाजारपेठेला जावे लागते. पण यावेळी कोल्हापूरला जाताना कोगनोळी आणि बेळगावला जाताना हत्तरगी टोलनाक्यावर वाहनांना टोल घेतला जातो. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने …

Read More »

निपाणी नगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांचे कामबंद आंदोलन

  निपाणी : निपाणी शहर हे बेळगाव जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर म्हणून ओळखले जाते. निपाणी नगरपालिकेत एकूण 48 कंत्राटी कामगार आहेत. या कामगारांचे मागील तीन महिन्यापासूनचे वेतन थकल्यामुळे या कामगारांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. कामगारांच्या थकीत वेतनासाठी नगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी करून देखील कामगारांच्या या मागणीकडे निपाणी …

Read More »

ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे गुरु पौर्णिमेनिमित्त गुरुजनांचा सत्कार

  निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त ज्येष्ठ शिक्षकांचा सत्कार व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष रघुनाथराव घोरपडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कुशाप्पा पाटील उपस्थित होते. सचिव अशोक तोडकर यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष दादासो पाटील यांनी प्रास्ताविकात संघाच्या कार्याचा आढावा घेतला. मासा …

Read More »

निपाणी – सुळगाव बसच्या वेळेत बदल करण्याची मागणी

  निपाणी (वार्ता) : निपाणीहून सुळगावला जाण्यासाठी संध्याकाळी ६ वाजता बस आहे. पण विद्यार्थी आणि विद्यार्थिनी घरी पोहचण्यास रात्री उशिरा होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी वरील वेळेऐवजी सायंकाळी ५:१० वाजता बस सोडून सहकार्य करावे, या मागणीचे निवेदन कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते आगार प्रमुख संगाप्पा यांना …

Read More »

नूतन मराठी विद्यालयात रंगला रिंगण सोहळा

  विद्यार्थ्यांनी केल्या विविध वेशभूषा : शहरातून पालखी मिरवणूक निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालयामध्ये आषाढी एकादशीच्या कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळ्याचे नियोजन केले होते. शिवाय माऊली अश्वाचा रिंगण सोहळा पार पडला. संस्थेचे संचालक विक्रमादित्य धुमाळ यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून …

Read More »

मागासवर्गीय समाजातील युवकांनी उद्योजक व्हावे

  पालकमंत्री सतीश जारकीहोळी; बोरगाव ओमगणेश टेक्स्टाईलला भेट निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारकडून मागासवर्गीय समाजासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवित आहे. अल्प व्याजदरात व मोठ्या प्रमाणात सबसिडी देऊन उद्योग व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देत आहे. त्याचा दलित व मागासवर्गीय समाजातील युवकांनी लाभ घेऊन उद्योजक व्हावे, असे आवाहन पालकमंत्री सतीश जारकीहोळी …

Read More »

सीमाप्रश्नी संसदेत आवाज उठवावा; खासदार शाहू महाराज यांना निपाणी विभाग समितीच्यावतीने विनंती

  निपाणी : तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज यांची कोल्हापूर येथे नु पॅलेसमध्ये सदिच्छा भेट घेतली. श्रीमंत शाहू महाराज यांची कोल्हापूरच्या लोकसभा खासदार पदी निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला, त्यानंतर सीमाप्रश्नी आपण संसदेत मुद्दा उपस्थित करून संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधून सीमाभागाधील 865 …

Read More »