Saturday , October 24 2026
Breaking News

निपाणी

पालकमंत्र्यांना भेटून यमगर्णी गायरान प्रश्न मिटविणार

                      जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे; आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन दिले आश्वासन निपाणी (वार्ता) : यमगर्णी येथील गायरान जमीन वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी पुकारलेल्या ‘गायरान बचाव’ उपोषणाला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे. चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी उपोषणकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन गावकऱ्यांच्या …

Read More »

ऐन नवरात्रोत्सवात दिवसासह रात्री बत्ती गुल्ल; पाणीपुरवठ्यासह धार्मिक कार्यक्रमात विघ्न

  निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरात नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे. दररोज प्रत्येक गावात सार्वजनिक ठिकाणासह घरोघरी पूजाअर्चा करण्यात येत आहे. पण दिवसा आणि रात्री विजेचा लपंडाव सुरू झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. शिवाय पिकांना पाणी देणेही शेतकऱ्यांना अडचणीचे ठरत आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी …

Read More »

मेंढपाळाच्या मुलीला ‘बीडीएस’साठी शासकीय कोट्यातून प्रवेश बेनाडीच्या साक्षी सौंदलगे हिचे लख्ख यश

  निपाणी (वार्ता) : मेंढपाळ समाजातील बेनाडीतील कन्या साक्षी काकासाहेब सौंदलगे हिला बंगळुरू येथील ऑक्सफर्ड डेंटल(दंतवैद्यकीय) महा विद्यालयात सरकारी कोट्यातून प्रवेश मिळाला आहे. तिच्या या लख्ख यशामुळे गावासह मेढपाळ समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे. शिवाय बेनाडीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. बेनाडीतील काकासो हल्लाप्पा सौंदलगे यांची कन्या …

Read More »

शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत ३ एकरातील ऊस जळून खाक

  ३.८० हजार रुपयाचे नुकसान ; लखनापूर येथील घटना निपाणी (वार्ता) : लखनापूर-जत्राट हद्दीतील निपाणी मधील शेतकरी श्यामसुंदर बळवंत कोरडे यांच्या सर्वे नंबर २३५ मधील ३.५ एकर मधील ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक झाला. सोमवारी (ता.१२ दुपारी) २ वाजता ही घटना घडली. त्यामध्ये कोरडे यांचे ३ लाखाची नुकसान झाल्याची नोंद अग्निशामक …

Read More »

निपाणीत सराफी दुकानात धाडसी दरोडा; २५ लाखाचा मुद्देमाल लंपास

  चोरट्यांच्या तपासासाठी पथके रवाना निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील गजबजलेल्या चन्नम्मा सर्कल परिसरामध्ये सोमवारी (ता.१२) पहाटेच्या सुमारास सराफ दुकानावर धाडसी दरोडा पडल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत सुमारे २५ लाख रुपयांचा सोन्या, चांदीचा ऐवज लंपास झाला आहे. विलास माळी असे या सराफ व्यवसायिकांचे नाव आहे. या घटनेमुळे शहरातील …

Read More »

प्रज्वल करडे याची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील संग्गोळी रायण्णा कन्नड माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी प्रज्वल करडे यांने जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत यश मिळवले आहे. त्याची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यानिमित्त त्याचा संस्थेचे संस्थापक लक्ष्मण चिंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास चेतन पाटील, मुख्याध्यापक पी. ए. पाटील, एम. ए. करडे, प्रकाश करडे, …

Read More »

स्तवनिधी येथील ए. एस. पाटील हायस्कूलमध्ये पालक सभा

  निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ, बाहुबली संचलित स्तवनिधी येथील ए. एस. पाटील हायस्कूल येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील द्वितीय पालक सभा पार पडली. अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक महावीर पाटील होते. यावेळी पालकप्रतिनिधी म्हणून रावसाहेब यमकनमर्डी, शामबाला पाटील उपस्थित होते. मुख्याध्यापक बी. बी. दादनवर यानी प्रास्ताविक करून पालक सभेचा उद्दिष्ट स्पष्ट …

Read More »

कायद्याच्या चौकटीत बसवून ग्रामस्थांना न्याय देणार

  सहकाररत्न उत्तम पाटील ; यमगर्णी आंदोलनस्थळी दिली भेट निपाणी (वार्ता) : यमगर्णी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक नागरिकांच्या गरजा व अडचणी सोडवण्यासाठी गायरान जमिनी वापरणे योग्य आहे. यमगर्णी या जमिनीवर प्रस्तावित सांडपाणी धनकचरा प्रकल्पाबाबत ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी. या प्रश्नावर ग्रामस्थांच्या पाठीशी असून या प्रश्न मुख्यमंत्री …

Read More »

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी सद्गुरु तायक्वांदोच्या खेळाडूंची निवड

  निपाणी (वार्ता) : बेळगाव येथे झालेल्या बेळगाव जिल्हा पंचायत, युवा सबलीकरण आणि क्रीडा क्षेत्राच्या संयुक्त विद्यमाने विभागीय पातळीवरील चीफ मिनिस्टर दसरा तायक्वांदो स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये येथील सद्गुरू तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. स्पर्धेमध्ये ४५ किलो आतील वजन गटांमध्ये समर्थ निर्मले यांने सुवर्णपदक पटकावले तर मुलींच्या …

Read More »

काँग्रेस मागासवर्गीय सेल उपाध्यक्षपदी स्नेहल माने यांची निवड

  निपाणी (वार्ता) : चिकोडी जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या उपाध्यक्षपदी येथील स्नेहल प्रमोद माने यांची निवड करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, उपाध्यक्ष रोहन साळवे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम तसेच केपीसीसी महिला सेक्रेटरी वर्षा चव्हाण यांच्या शिफारशीनुसार ही …

Read More »