Friday , October 23 2026
Breaking News

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी सद्गुरु तायक्वांदोच्या खेळाडूंची निवड

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बेळगाव येथे झालेल्या बेळगाव जिल्हा पंचायत, युवा सबलीकरण आणि क्रीडा क्षेत्राच्या संयुक्त विद्यमाने विभागीय पातळीवरील चीफ मिनिस्टर दसरा तायक्वांदो स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये येथील सद्गुरू तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. स्पर्धेमध्ये ४५ किलो आतील वजन गटांमध्ये समर्थ निर्मले यांने सुवर्णपदक पटकावले तर मुलींच्या गटात ६५ किलो आतील गटांमध्ये सौम्या खोत या विद्यार्थिनीने सुवर्णपदक पटकावले यशस्वी विद्यार्थ्यांची१२ आणि १३ ऑक्टोंबर रोजी म्हैसूर येथे श्री चामुंडेश्वरी विहार स्टेडियम येथे होणाऱ्या राज्यस्तरीय चीफ मिनिस्टर कप तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना तायक्वांदो प्रशिक्षक बबन निर्मले यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव परिसरात दसऱ्यानिमित्त आयुध पूजनासह सीमोल्लंघन सोहळा

Spread the love  निपाणी (वार्ता) : विजयादशमी निमित्त बोरगाव शहर आणि परिसरात विविध कार्यक्रमासह आयुध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *