Friday , October 23 2026
Breaking News

काँग्रेस मागासवर्गीय सेल उपाध्यक्षपदी स्नेहल माने यांची निवड

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : चिकोडी जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या उपाध्यक्षपदी येथील स्नेहल प्रमोद माने यांची निवड करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, उपाध्यक्ष रोहन साळवे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम तसेच केपीसीसी महिला सेक्रेटरी वर्षा चव्हाण यांच्या शिफारशीनुसार ही निवड करण्यात आली.
निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम यांच्या हस्ते स्नेहल यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी केपीसीसी महिला सेक्रेटरी वर्षा
चव्हाण, सुमन खवरे, अंजना पोतदार, अमिना मकानदार, सलमा शेख, रेश्मा चिपळूणकर, कविता कांबळे, शोभा जामुने, राजश्री चव्हाण, रुक्मिणी वराळे, फरीदा बुखारी, रेखा वाघेला, अस्लम शिकलगार, किरण पाटोळे, डॉ.संजय कांबळे, निपाणी ब्लॉक युथ काँग्रेस उपाध्यक्ष लोकेश घस्ते, सुमित चव्हाण, आदर्श घेवारी, रघुनाथ नाईकवाडे, फारूक पटेल, भालचंद्र पारळे, नितीन घटेकरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव परिसरात दसऱ्यानिमित्त आयुध पूजनासह सीमोल्लंघन सोहळा

Spread the love  निपाणी (वार्ता) : विजयादशमी निमित्त बोरगाव शहर आणि परिसरात विविध कार्यक्रमासह आयुध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *