निपाणीत दीपक दळवींची शोकसभा; सीमा लढा यशस्वी करण्याचा निर्धार निपाणी (वार्ता) : कर्नाटक -महाराष्ट्र सीमा लढ्याचा सक्रिय सहभाग घेऊन दीपक दळवी यांनी प्रशासनाच्या विरोधात बुलंद आवाज उठवत मराठी भाषकांना जागृत करण्याचे काम केले होते. प्रामाणिकपणा, निष्कलंक चारित्र्य आणि धडाडीचे नेतृत्व त्यांच्याकडे होते. त्यांनी बऱ्याच वेळा न्यायालयाबरोबरच रस्त्यावरची लढाई ही …
Read More »सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष सत्यनायक यांना मुख्यमंत्री पदक पुस्कार जाहीर
निपाणी (वार्ता) : निपाणी येथे मंडल पोलीस निरीक्षक म्हणून सेवा बजवलेले व सध्या बेळगाव येथे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून सेवा बजावणारे कर्तव्यदक्ष अधिकारी संतोष सत्यनायक यांना मुख्यमंत्री पदक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या प्रदीर्घ आणि प्रशंसनीय सेवेची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मंडल पोलीस निरीक्षक संतोष …
Read More »गळतगा येथे बीरसिद्धेश्वर नगरखाना क्रांतिवीर संगोळी रायण्णा पुतळ्याचे अनावरण
निपाणी (वार्ता) : धनगर समाजाचे आराध्य दैवत श्री. क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि महाद्वार नगरखाना उद्घाटन समारंभ शनिवारी (ता.२८) सहकाररत्न उत्तम पाटील यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यानिमित्त सकाळी मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये धनगर समाज बांधव व महिला सहभागी झाल्या होत्या. सकाळी स्वामींच्या हस्ते …
Read More »भूमी वात्सल्य सोशल फाउंडेशन फाउंडेशनतर्फे पर्यावरणासह वाचन चळवळ उपक्रम
निपाणी (वार्ता) : पर्यावरण संवर्धन आणि वाचन संस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने निपाणी येथील साई चैतन्य निवासस्थानी सदिच्छा भेट पार पडली. यावेळी नंद्याळ स्मशानभूमीत वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. याशिवाय वाचन चळवळीला चालना देण्यासाठी विविध उपक्रमांवर चर्चा करण्यात आली.नंद्याळ येथील स्मशानभूमीत वड, पिंपळ, उंबर यांसारख्या पर्यावरणपूरक रोपांची लागवड करण्यात आली. …
Read More »कुटुंबाचा त्याग करून कांशीरामांनी समाजाला दिशा दिली
ॲड. राजेंद्र थरकार; मानकापूर येथे जयंतीनिमित्त कार्यक्रम निपाणी (वार्ता) : बहुजन समाजाचे नायक कांशीराम यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य भारतभर सायकलने प्रवास करून बहुजन समाजापर्यंत तळमळीने पोहोचविले आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांची ध्येयधोरणे युवकांना पटवून दिली. कांशीराम यांनी आपल्या कुटुंबाचा त्याग करून ‘बँक बॅलन्स झिरो’सारखे अनेक उपक्रम राबविल्याचे जस्टीस …
Read More »‘रवळनाथ’ हौसिंग फायनान्समध्ये गुढीपाडव्याला ७.९० कोटी ठेवींचे संकलन
ग्राहकांचा नवीन वर्षात उत्स्फूर्त प्रतिसाद; १६ मल्टीस्टेट शाखाद्वारे संस्थेचे कार्य निपाणी (वार्ता) : गडहिंग्लज येथील श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स (मल्टी-स्टेट) संस्थेमध्ये १६ शाखांमध्ये मिळून तब्बल ७ कोटी ९० लाख इतक्या ठेवींचे संकलन झाले आहे, अशी माहिती ‘रवळनाथ’चे संस्थापक अध्यक्ष व संचालक एम. एल. चौगुले, अध्यक्ष प्राचार्य डॉ. आर. …
Read More »निपाणीतील श्रीराम नवमी उत्सवाची पालखी सोहळ्यासह विविध कार्यक्रमाने सांगता
निपाणी (वार्ता) : निपाणी शहरात गेल्या नऊ दिवसापासून रामनवमी सोहळ्यानिमित्त विविध येथील बेळगाव नाक्यावरील श्रीराम मंदिरासह इतर ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे शहर आणि उपनगरात चैतन्याचे वातावरण पसरले होते. या रामनवमी उत्सवाची पालखी सोहळ्याने शुक्रवारी (ता.२७) सांगता करण्यात आली. सांगता सोहळा निमित्त येथील श्रीराम मंदिरात सकाळी …
Read More »भीमापूरवाडीत रामनवमीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद
निपाणी (वार्ता) : निपाणी मतदारसंघातील भिमापुरवाडी गावातील मर्यादा पुरुषोत्तम श्री राम मंदिरामध्ये जन्मोत्सवानिमित्त करण्यात आले होते. त्याला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन रामाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. भोज माजी जिल्हा पंचायत सदस्य व कर्नाटक राज्य ओसीसीआय संचालक राजेंद्र -पवार वडर यांच्या हस्ते श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन आणि आरती करण्यात …
Read More »बोरगाव येथील मराठा समाज जागेसाठी उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : बोरगाव शहरातील मराठा समाजासाठी जागा उपलब्ध व्हावी, या मागणीसाठी सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. मराठा समाजाला जागा मिळावी, यासाठी नगरपंचायतीच्या मासिक सभेत ठराव करण्यात आला होता. या कार्याला गती मिळून समाजाला तात्काळ जागा मिळून समाजाचे …
Read More »आध्यात्मिक प्रगतीसाठी दत्तपाठ पुस्तकेचा उपयोग
परमात्माराज महाराज ; पुस्तक प्रकाशन सोहळा निपाणी (वार्ता) : भगवान् दत्तात्रेय स्वरूप हे दत्तपाठ समन्वयस्वरूप आहे. विविध संप्रदायांना एकत्र आणून व्यावहारिक जीवनातील अडचणी दूर करून आध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी दत्तपाठ या सत्संग्रह रूपिणी पुस्तिकेचा उपयोग निश्चितच होणार आहे, असे मत परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले. ते आडी (ता. निपाणी) येथील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta